• Thu. Apr 17th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण शिवसेना ठाकरे गटातर्फे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरुद्ध जोरदार निदर्शने

ByEditor

Apr 8, 2025

विठ्ठल ममताबादे
उरण :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने उरण येथे महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शेतकरी कर्जमाफीचे पैसे ‘साखरपुडा व लग्नात खर्च करतात’ या शेतकऱ्यांबद्दलच्या बेजबाबदार वक्तव्याविरुद्ध जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने व निषेध आंदोलन करून त्यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, उप जिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर व माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली.

यावेळी उरण शहरप्रमुख विनोद म्हात्रे, उपजिल्हा संघटिका ममता पाटील, उपतालुका संघटिका सुजाता पाटील, उपशहर संघटिका माधुरी चव्हाण, विभागप्रमुख एस. के. पुरो, माजी विभागप्रमुख सूर्यकांत दरने, माजी शहरप्रमुख निरंतर कदम, प्रवीण मुकादम, माजी नगराध्यक्ष परमानंद करगुटकर, सोशल मीडिया समन्वयक नितीन ठाकूर, ग्राहक संरक्षण कक्ष तालुका संघटक ओमकार घरत, शहर संघटक संदीप जाधव, वाहतूक सेनेचे विभाग संघटक संतोष पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते गुलजार भाटकर, नंदू पाटील, पंढरीनाथ घरत, रवी पाटील, रवींद्र भोईर, माजी उपसरपंच कुंदन भोईर, शाखाप्रमुख गुरुनाथ घरत, सचिन पाटील, इस्माईल शेख, शाहरुख गडी, फत्तेखान, मिलिंद भोईर, राजेश निकम, विनोद खेतपाल, समीर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

प्रत्येक वेळी मंत्री माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांचा अपमान करत असल्याने शेतकऱ्यांसह विरोधी पक्षांनी सुद्धा त्यांचा मोठया प्रमाणात निषेध करून तीव्र संताप व्यक्त केला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!