• Sun. May 25th, 2025 4:49:17 PM

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ऑनलाईन रमीच्या नादात तरुणाची आत्महत्या

ByEditor

Apr 9, 2025

खोपोली : येथील तरुणाने ऑनलाईन रमीच्या नादात कर्जबाजारी झाल्याने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. 7) रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. साईबाबानगर येथील सुनील नडवीरमणी (वय 32, रा. साईबाबानगर, खोपोली) असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेने साईबाबानगरवर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खोपोलीतील सुनील नडवीरमणी हा तरुण सोमवारी औषध आणायला जातो असे सांगून घराबाहेर पडला. बराचवेळ तो घरी आला नाही, म्हणून शोधाशोध केली असता, त्याचा मृतदेह खोपोली रेल्वे स्थानकामध्ये आढळून आला. त्याने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. सुनीलला ऑनलाइन रमी खेळण्याची सवय होती. यामध्ये तो कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याची परिसरात चर्चा होती.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!