• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अलिबाग येथे दुकानदाराला धमकी देत मारहाण करून पाच लाख खंडणीची मागणी; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ByEditor

Apr 10, 2025

अमुलकुमार जैन
अलिबाग :
रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे धमकी देत पाच लाख रुपयांची मागणी तसेच मारहाण केल्याबाबत शुभम पाटील, विराज राणे तसेच इतर तीन जणांविरुद्ध अलिबाग पोलिस ठाण्यात हर्ष भोलाराम चौधरी (बिकानेर स्विट मार्ट, ता. अलिबाग, फिर्यादी रा. प्लॅट नं 208, सद्गुरू बिल्डींग, सेंटमेरी स्कुलच्या समारे श्रीबाग नं 2, ता अलिबाग) याने तक्रार दाखल केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रायगड जिल्ह्यातील अलिबाग पोयनाड रस्त्यावरील अलिबाग रिलायन्स पेट्रोल पंपासमोर असलेल्या बिकानेर स्विट मार्ट येथे दिनांक 08/04/2025 रोजी दुपारी दोनच्या सुमारास फिर्यादी हर्ष चौधरी हे त्यांचे काका यांच्यासमवेत दुकानात असताना इनोव्हा गाडी क्रमांक एमएच 43/एएफ/0294 मधून दोन इसम हे दुकानात आले व त्यांनी हर्ष चौधरी यांचे काका यांना विचारणा केली की, तुमचा कामगार नवाराम कुठे आहे? हर्ष चौधरी याचे काका यांनी सांगितले नवाराम हा बाहेर गेला आहे. असे सांगितले असता दोन इसमांपैकी काळ्या रंगाच्या फुल हाताच्या टिशर्ट घातलेल्या इसमाने फिर्यादीचे काकांकडे तुम्हाला इथे धंदा करायचा असेल तर तुम्हाला पाच लाख रूपये द्यावे लागतील नाहीतर दररोज वेगवेगळे ग्राहक यांना खराब माल दिला असा बनाव करून व सोशल मिडीयावर बदनामी करून तुमचा धंदा बंद करू. आम्ही अशी कोणतीही कारवाई करू नये असे तुम्हाला वाटत असेल तर गुपचुप 5 लाख रूपये देवुन मॅटर संपवुन टाका नाहीतर तुझे कामगाराला आमचे समक्ष हजर करा, नाहीतर त्याला पुन्हा राजस्थानला पाठविला तर पहा असे बोलू लागले. अशी खंडणी मागुन ती नाही दिली तर तुझे कामगाराला हजर कर असे बोलले असता हर्ष चौधरी याचे काका यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्या इसमाने हर्ष चौधरी याचे काका याच्या कानाखाली मारून त्यांना शिविगाळ केली. तसेच त्यांच्या पैकी एका इसमाने त्यांच्या फोनवरून फोन करून शुभम पाटील, विराज राणे या दोन इसमास बोलावुन घेवुन व अन्य एक इसम सफेद रंगाची क्रेटा कारमधुन हर्ष चौधरी याचे दुकानात आला व त्याने फिर्यादीचा कामगार याच्यासोबत बोलाचाली करून त्याच्या कानाखाली मारली. त्यावेळी हर्ष चौधरी याची काकी यांनी त्यांना विचारणा केली असता विराज राणे याने तिला देखील शिविगाळ केली.

याबाबत अलिबाग पोलीस ठाणे गुरनं.62/2025, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 308(3), 352, 351(2),115(2),189(2),191(2),3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक संतोष भुंडेरे हे करीत आहेत

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!