• Fri. Mar 13th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पेण क्रीडा संकुल येथे उन्हाळी क्रीडा कौशल्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

ByEditor

Apr 10, 2025

८ ते १६ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना सुवर्णसंधी

विनायक पाटील
पेण :
महाराष्ट्र शासन क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड यांचे अधिपत्याखालील तालुका क्रीडा संकूल समिती, पेण यांच्या मार्फत पेण तालुक्यातील विद्यार्थी खेळाडूंसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीतील सदुपयोग म्हणून तालुका क्रीडा संकूल पेण येथे विविध खेळांचे क्रीडा कौशल्य व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन दिनांक १५ एप्रिल ते ३१ मे २०२५ या कालावधीत करण्यात येत आहे. सदर शिबिर हे आमदार तसेच तालुका क्रीडा संकूल समिती, पेण व तहसिलदार तथा कार्याध्यक्ष, तालुका क्रीडा संकूल समिती यांच्या मार्गदर्शनाने आयोजित केले जात आहे.

सदर शिबिरात सहभागी खेळाडूंना त्या त्या खेळाच्या तज्ञ क्रीडा प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण दिले जाणार असून तालुका क्रीडा संकूल समितीमार्फत खेळाडूंना मोफत गणवेष दिला जाणार आहे.दीर्घ काळ चालणाऱ्या या प्रशिक्षणातून खेळाडू टॅलेन्ट हंट योजनेव्दारा प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना वर्षभर नियमित प्रशिक्षण देण्याचा व यातून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडविण्याचा संस्थेचा मानस आहे.

सदर शिबिर तालुका क्रीडा संकुल पेण, गोविंद बाग येथे होणार असून सकाळी ७ ते ९ आणि संध्याकाळी ४ ते ७ या वेळेत पार पडणार आहे. यामध्ये अनुभवी तज्ञ क्रीडा प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन, खेळाडूंचा आत्मविश्वास वाढविणे, सामुहिक कार्य व सहकार्य, नेतृत्वगुण निर्माण करणे, संवाद साधणे, सार्वजनिक बोलणे, भावनिक बुद्धिमत्ता आणि सहानूभूती तसेच उद्दिष्ट निर्धारण आणि वेळ व्यवस्थापन याचबरोबर खेळाडूचे व्यक्तिमत्व विकास होणे. खेळामधून मनोरंजन व मनोरंजनातून खेळाची आवड निर्माण करणे हा उद्दिष्ट आहे.तरी सर्व खेळाडूंनी आपले प्रवेश अर्ज तालुका क्रीडा संकुल पेण येथे सादर करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!