• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

भरधाव ट्रेलरने रस्ता ओलांडऱ्या आठ वर्षाच्या मुलीला चिरडले

ByEditor

Apr 15, 2025

अनंत नारंगीकर
उरण :
तालुक्यातील न्हावा शेवा पोलीस ठाणे हद्दीतील जेएनपीए पोर्ट ते पनवेल मार्गावरील फ्री गेट सिग्नलजवळ रस्ता ओलांडताना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलरने एका आठ वर्षीय मुलीला चिरडल्याची घटना घडली आहे. ज्योती भागवत शिंदे (८) असे मयत मुलीचे नाव आहे.

जेएनपीए परिसरात अवजड वाहतुक करणाऱ्या ट्रेलर चालकांकडून बेदरकापणे वाहन चालवल्याने कुठे न कुठे अपघात होत आहेत. असाच अपघात काल सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास झाला. भागवत शिंदे कुटुंब आपल्या दिवसभराच्या लेबर कामावरून घरी म्हणजे नवघर येथील झोपडपट्टीमध्ये राहत असलेल्या ठिकाणी जात असताना रस्ता ओलांडताना वेगाने आलेल्या MH ४६ AR ०२९५ या ट्रेलरची धडक त्यांच्यासोबत असणाऱ्या ज्योती भागवत शिंदे या आठ वर्षीय मुलीला बसली. तिच्या डोक्याला मोठी दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे.

या अपघात संदर्भात न्हावा पोलीस ठाण्यात ट्रेलर चालक अभयकुमार रामधणी गौतम याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १०६/१,१२५अ, ब, २८/१ नुसार गुन्हा दखल करण्यात आला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!