धुतूम गावाला बसले स्फोटाचे धक्के, कामगार होरपळला
अनंत नारंगीकर
उरण : धुतूम ग्रामपंचायत हद्दीत ज्वलनशील पदार्थ साठवून ठेवणारी इंडियन आईल सध्याची इंडियन ऑईल अदानी व्हेंचर लि. हा प्रकल्प आहे. या प्रकल्पात बुधवारी (दि. १६) ४-४० च्या सुमारास स्फोट झाला. या स्फोटातील आगीत एक कामगार होरपळून गेला असून त्याला उपचारासाठी नवीमुंबई येथील रुग्णालयात नेण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होत आहे. या स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती कि धुतूम गाव स्फोटाने हादरुन गेले आहे.

उरण तालुक्यातील धुतूम ग्रामपंचायतीच्या हद्दीत ज्वलनशील पदार्थ साठवून ठेवणारी इंडियन आईल सध्याची इंडियन ऑईल अदानी व्हेंचर लि. हा प्रकल्प आहे. या प्रकल्पात आँईल, पेट्रोलसह इतर ज्वलनशील पदार्थ साठवून ठेवले जातात. या प्रकल्पाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची उपाययोजना प्रकल्प व्यवस्थापनाने न केल्याने बुधवारी (दि. १६) ४.४०च्या सुमारास स्फोट झाला. या स्फोटातील आगीत एक कामगार होरपळून गेला असून त्याला उपचारासाठी नवीमुंबई येथील रुग्णालयात नेण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होत आहे. या स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती कि धुतूम गाव स्फोटात हादरुन गेले असून गावकऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी जाणे पसंत केले.

या घटनेची माहिती तात्काळ उरण पोलीस यंत्रणेला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन कामगारांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला. सिडको, जेएनपीए अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळावर धाव घेऊन स्फोटातील आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
या घटनेसंदर्भात इंडियन ऑईल अदानी व्हेंचर लि. प्रकल्पाचे अधिकारी वर्गाकडे विचारणा केली असता त्यांनी बोलण्यास नकार दर्शविला आहे.
धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील इंडियन ऑईल अदानी व्हेंचर लि. या प्रकल्पात आग लागली असून आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
-जितेंद्र मिसाळ
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरण पोलीस ठाणे
धुतूम ग्रामपंचायत हद्दीत इंडियन ऑईल अदानी व्हेंचर लि. हा प्रकल्प असून या प्रकल्पात बुधवारी स्फोट घडण्याची घटना घडली असून रहिवाशांच्या घरांना हादरे बसले आहेत. गावकरी भयभीत झाले असून या घटनेसंदर्भात सर्व गावकरी प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराजवळ जमा झाले आहेत. या प्रकल्पात स्थानिक, प्रकल्पग्रस्तांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांनी या अगोदर उपोषण सुरू केले होते. तेव्हा पोलीस यंत्रणेने गावकऱ्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता. आज अशा स्फोटाच्या घटना घडत असतील तर गावकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केली जात आहे असा सवाल धुतूम ग्रामपंचायत प्रकल्पातील अधिकाऱ्यांना विचारणा करत आहे.
-प्रेमनाथ ठाकूर
धुतूम ग्रामपंचायत सदस्य