सलीम शेख
माणगाव : तेजस एक्सप्रेसची ठोकर लागून माणगाव तालुक्यातील मौजे तिलोरे येथील इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेला माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. १६ एप्रिल रोजी मयत मोतीराम बाळोजी ढाकवळ (वय ४५, रा. तिलोरे) यास किलोमीटर स्टोन क्र. २६/० ते २६/१ या मध्ये दाखणे रेल्वे गेट क्र. ११ जवळ तेजस एक्सप्रेस गाडी क्र. २२१२० अपची ठोकर लागून त्यास डाव्या पायास गंभीर दुखापत झाल्याने उपचाराकरता उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे आणले असता तेथील डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून पुढील तपास पो. नि. निवृती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. बेलदार करत आहेत.