अनंत नारंगीकर
उरण : उरण परिसरातील विद्यार्थी, शेतकरी, नागरिक हे आपली शासकीय कामे करुन घेण्यासाठी उरण शहरातील शासकीय कार्यालयात ये-जा करत आहेत. मात्र, उरण तहसील कार्यालयाच्या प्रांगणात असलेली पिण्याच्या पाण्याची पाणपोई नामशेष झाल्याने वाढत्या उष्णतेमुळे व्याकुळ झालेल्या नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी गैरसोय होत आहे. तरी प्रत्येक शासकीय कार्यालयात नागरिकांसाठी अधिकारी वर्गाने उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करावी अशी मागणी नागरिक व्यक्त करीत आहेत.
वाढत्या उन्हामुळे उकाडाही वाढला आहे. अशा वाढत्या उन्हामुळे आजारांची समस्याही निर्माण झाली आहे. तसेच उष्माघाताचा त्रास जाणवत असल्याने थंड पाणी पिण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. उरण तालुक्याचा पारा ३८ ते ४० अंशांवर जात आहे. एकंदरीत वातावरणातील या बदलाने थंडपेयांना मागणी वाढली आहे. परिसरातील विद्यार्थी, शेतकरी, नागरिक हे आपली शासकीय कामे करुन घेण्यासाठी उरण शहरातील शासकीय कार्यालयात ये-जा करत आहेत. अशा शासकीय कार्यालयात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यात उरण तहसील कार्यालयाच्या प्रांगणात असलेली पिण्याच्या पाण्याची पाणपोई नामशेष झाल्याने नागरिकांची पिण्याच्या पाण्यावाचून गैरसोय होत आहे. तरी प्रत्येक शासकीय कार्यालयात नागरिकांसाठी अधिकारी वर्गाने उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करावी अशी मागणी नागरिक व्यक्त करीत आहेत.
