• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

‘गावदेवी रामनाथ प्रीमियर लीग 2025’ स्पर्धेत अनन्य इलेव्हन संघ ठरला अंतिम विजेता

ByEditor

Apr 22, 2025

श्रीकांत नागांवकर आणि प्रथमेश नागांवकर यांचा मोरया वॉरिअर्स रामनाथ संघ ठरला उपविजेता

अलिबाग : अलिबागमधील रामनाथ येथे शनिवार, रविवारी ‘गावदेवी रामनाथ प्रीमियर लीग 2025’ पर्व पहिले (GRPL-2025) स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेचे आयोजन गावदेवी रामनाथ क्रिकेट क्लब, रामनाथ-अलिबाग तर्फे करण्यात आले होते. या स्पर्धेत रामनाथ विभागातील खेळाडूंनी सहभाग घेतला. ऑक्शन पद्धतीने खेळाडूंची निवड करण्यात आली. आठ संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.

या स्पर्धेचा उदघाटन सोहळा अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, ॲड. मानसी म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेदरम्यान अलिबाग-मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांनी भेट दिली. या स्पर्धेत नंदकुमार पालवणकर आणि योगेश पालवणकर यांचा अनन्य इलेव्हन रामनाथ संघ विजयी ठरला. संघाकडून अंतिम सामन्यात कर्णधार देवेंद्र पालवणकर व मंथन यांनी दमदार फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला. तसेच उपविजेता ठरला तो श्रीकांत नागांवकर आणि प्रथमेश नागांवकर यांचा मोरया वॉरिअर्स रामनाथ संघ. या संघाकडून कर्णधार सुरज भोगले व प्रथमेश नागांवकर यांनी उत्कृष्ट फटकेबाजी करत अंतिम सामन्यात संघाला 65 धावांची मजल मारून दिली.

या स्पर्धेत बक्षीसांची लयलूट करण्यात आली. सायकल, टीव्ही, कूलर अशी अनेक पारितोषिके देण्यात आले. स्पर्धेचा मालिकावीर ठरला मोरया वॉरिअर्स संघाचा सुरज भोगले तर उत्कृष्ट फलंदाज देवेंद्र पालवणकर, उत्कृष्ट गोलंदाज दिलीप पालवणकर तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अभिजीत पाटील यांना देण्यात आले. स्पर्धेत आठही संघ बलाढ्य असल्याने ताकतीने लढले. कपिल पालवणकर याने 6 चेंडूत 6 षटकार लगावले. या स्पर्धेसाठी सर्व युवा खेळाडू व रामनाथ ग्रामस्थ यांनी उत्तम प्रतिसाद आणि सहकार्य केले.

या स्पर्धेसाठी सौरभ पालवणकर, रोहन गुरव, रितेश गुरव, देवेंद्र पालवणकर, कपिल पालवणकर, ओमकार मंगरूळकर, रितेश मढवी, अमरेश शेवडे, शंतनू नांदगावकर, यश पालवणकर, स्वागत पालवणकर, विराज चौलकर, नंदकुमार पालवणकर, दिलीप पालवणकर, सुशांत गुरव, सचिन गुरव, अभिजित पाटील, राकेश चौलकर, शैलेश पालवणकर, ॲड. शिंदे, ॲड. पराग गुरव, योगेश पालवणकर, श्रीकांत नागांवकर, प्रथमेश नागांवकर, संतोष गुरव, केतन चिरनेरकर, रुपेश चौलकर, विशाल चौलकर, रविंद्र पालवणकर यांनी विशेष मेहनत घेतली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!