अनंत नारंगीकर
उरण : तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीच्या २०२५ ते २०३० या कालावधीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच महिला यांच्यासाठी राखून ठेवण्याच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडत आज दि. २३ एप्रिल २०२५ रोजी जेएनपीए वसाहतमधील बहुउद्देशीय सभागृहात उपविभागीय अधिकारी पवन चांदक यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या सोडतीमध्ये महिलांना जास्त प्राधान्य असल्याचे दिसून आले. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, मनसेचे तालुकाध्यक्ष ॲड. सत्यवान भगत, विनोद म्हात्रे ३५ ग्रामपंचायतमधील सरपंच, उपसरपंच, सदस्य, नागरिक उपस्थित होते.
उरण तालुक्यात असणाऱ्या ३५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी २०२५ ते सन २०३० या पाच वर्षात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर केल्यानुसार बुधवार, दि. २३ एप्रिल रोजी जेएनपीटी वसाहतीमधील बहुउद्देशीय सभागृहात घेण्यात आली. या सोडतीमध्ये ३५ ग्रामपंचायतपैकी १७ ग्रामपंचायतचे आरक्षण हे महिलांचे आले आहे. त्यामध्ये सर्वसाधारण ११ महिला आरक्षित नागरिकांचा मागास प्रवर्ग ५ महिला तर एक अनिसूचित जमाती महिला, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी खुला ४, सर्वसाधारण ११, अनुसूचित जमाती २ तर अनुसूचित जातीसाठी १ अशाप्रकारे सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर झाले असून ते गावनिहाय पुढील प्रमाणे.
१) जासई – अनुसूचित जाती
२) रानसई- अनुसूचित जमाती
३) चिरले – अनुसूचित जमाती
४) चाणजे – अनुसूचित जमाती महिला
५) हनुमान कोळीवाडा – नामाप्र महिला
६) पीरकोण – नामाप्र महिला
७) म्हातवली – नामाप्र महिला
८) जुई – नामाप्र महिला
९) केगाव – नामाप्र महिला
१०) वेश्वी – नामाप्र
११) बोकडवीरा – नामाप्र
१२) सोनारी- नामाप्र
१३) कळंबूसरे – नामाप्र
१४) विंधणे – सर्वसाधारण महिला
१५) सारडे –सर्वसाधारण महिला
१६) पागोटे – सर्वसाधारण महिला
१७) बांधपाडा – सर्वसाधारण महिला
१८) फुंडे – सर्वसाधारण महिला
१९) गोवठणे – सर्वसाधारण महिला
२०) पाणजे –सर्वसाधारण महिला
२१) पुनाडे – सर्वसाधारण महिला
२२) करल – सर्वसाधारण महिला
२३) नागाव – सर्वसाधारण महिला
२४) डोंगरी – सर्वसाधारण महिला
२५) कोप्रोली – सर्वसाधारण
२६) भेंडखल – सर्वसाधारण
२७) जसखार – सर्वसाधारण
२८) घारापुरी – सर्वसाधारण
२९) वशेणी – सर्वसाधारण
३०) आवरे – सर्वसाधारण
३१) नवीन शेवा – सर्वसाधारण
३२) चिरनेर – सर्वसाधारण
३३) दिघोडे – सर्वसाधारण
३४) नवघर – सर्वसाधारण
३५) धुतुम – सर्वसाधारण
याप्रमाणे गाव निहाय ३५ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर झाले असल्याची माहिती उरणचे तहसीलदार उद्धव कदम यांनी दिली आहे.