वैभव कळस
म्हसळा : तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण सोडत आज २३ एप्रिल रोजी न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा येथे काढण्यात आली. यामध्ये सर्वसाधारणसाठी १०, सर्वसाधारण स्त्री १२, अनुसूचित जमाती स्त्री. २, नामप्र स्त्री ५, नागरिकांचा मागास प्रवर्ग ६ आणि अनुसूचित जाती स्त्री १, अनुसूचित जाती १, अनुसूचित जमाती २ अश्या प्रकारे तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले.
उप विभागीय अधिकारी महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज म्हसळाच्या व्यासपीठावर काढण्यात आलेल्या या आरक्षण कार्यक्रमास तहसीलदार सचिन खाडे, निवासी नायब तहसीलदार चंद्रशेखर खोत, गटविकासाधिकारी माधव जाधव, अव्वल कारकून सचिन धोंडगे, सिनिअर लेखनिक सलीम शहा, तलाठी, तालुक्यातील सरपंच, विविध पक्षांचे पदाधिकारी आदि मान्यवर उपस्थित होते. ही सोडत न्यू इंग्लिश स्कूलची इयत्ता पाचवीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी कुमारी शांभवी समिर दिवेकर हिच्या हस्ते काढण्यात आली.