अनंत नारंगीकर
उरण : सिडको अतिक्रमण विभागाकडून बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीतील बेकायदा बांधकामांवर न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली. बुधवारी (दि. २३) केलेल्या कारवाईत बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीत बांधलेल्या अनाधिकृत चाळीच्या खोल्या तोडण्यात आल्या.
सिडकोच्या अतिक्रमण विभागाकडून या अगोदर ही अनाधिकृत टपऱ्यावर कारवाई करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशानुार बुधवारी (दि. २३) बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीत अनधिकृत बांधलेल्या चाळीतील खोल्या सिडकोच्या अतिक्रमण विभागाकडून तोडण्यात आल्या. यावेळी सिडकोकडून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्थानिक प्रकल्पग्रस्त रहिवाशांनी गरजेपोटी बांधलेल्या घरावर सिडकोचे अतिक्रमण विभाग कारवाईचा बुलडोझर फिरवणार तर नाही ना या भितीपोटी रहिवासी धास्तावले असल्याचे चित्र सदर कारवाई दरम्यान पाहायला मिळत होते.