• Thu. Jul 31st, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाडमध्ये १३४ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

ByEditor

Apr 24, 2025

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांचा हिरमोड!

मिलिंद माने
महाड :
शासनातर्फे सरपंच पदांच्या आरक्षणासाठी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी अनेकांना निकाल एकूण डोक्याला बांधलेले बाशिंग काढून ठेवण्याची वेळ आली. तालुक्यामध्ये १३४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले.

आज महाड मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये महाड तालुक्यातील १३४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. पेणचे उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाड तहसीलदार संतोष शितोळे यांच्या उपस्थितीत हे आरक्षण जाहीर करण्यात आले. यावेळी महाड तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीमधील प्रमुख पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सरपंच पदासाठी इच्छुक नागरिक उपस्थित होते. यावेळी ज्या ठिकाणी यापूर्वी अनुसूचित जातीसाठी खुल्या जागी ३ आणि महिला ३, अनुसूचित जमाती करिता ५ खुल्या तर ४ महिला, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी १८ खुल्या तर महिला १८, सर्वसाधारण जागेकरिता ४१ खुल्या तर ४२ महिला असे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

अनेक ग्रामपंचायतींमध्ये गुडघ्याला बाशिंग बांधून असणारे या आरक्षणानंतर मात्र नाराज होऊन घरी परतले. आरक्षण जाहीर झाल्यामुळे त्यांचे सरपंच पदाचे स्वप्न भंग पावले आहे. यावेळी एकूण ग्रामपंचायतींच्या आरक्षणापैकी 50% महिलांसाठी आरक्षित असल्याने जवळपास ६७ ठिकाणी महिला राज असणार आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!