बुधवारी विविध कार्यक्रमांसह हरिपाठ भजन किर्तनाचे आयोजन
विनायक पाटील
पेण : तालुक्यातील रामवाडी येथे सालाबादप्रमाणे या वर्षीही बुधवार, दि. ३० एप्रिल रोजी श्री लक्ष्मीनारायण उत्सव सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे.
रामवाडीतील श्री लक्ष्मीनारायण मंदिर कै. हरिभाऊ नामदेव पाटील व कै. अनंत हरिभाऊ पाटील यांनी जतन केले. त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे मुलं व नातू यांच्या वंशपरंपरेने चालत आलेला “श्री लक्ष्मी नारायण उत्सव सोहळा कार्यक्रम” मिती वैशाख शुक्लपक्ष ३ “अक्षय तृतीया” शके १९४७, बुधवार, दि. ३० एप्रिल २०२५ रोजी भक्तगणांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
या दिवशी सकाळी ६ देवतेचे अभिषेक, सकाळी ७ ते ९ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा तर १० ते १२ वाजता किर्तन गोरक्षक हभप कलावतीताई शिवकर यांचे (समाज प्रबोधनकार), गायनाचार्य हभप जयदास शिवकर, मृदंगमणी शार्दूल शिवकर, साथकरी जोगेश्वरी हरिपाठ (कांदळेपाडा) कार्यक्रम तर १२ वाजता पुष्पवृष्टी सोहळा व आरती तसेच १२ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्या असे आवाहन व्यवस्थापक पाटील परिवार, श्री लक्ष्मीनारायण मित्र मंडळ, ग्रामस्थ मंडळ व ज्येष्ठ नागरिक संघ रामवाडी यांच्याकडून करण्यात आले आहे.