रेवली येथील शेतकऱ्याने गोठ्यात बांधून ठेवलेल्या वासरावर बिबट्याचा हल्ला
वैभव कळस
म्हसळा : तालुक्यातील रेवली येथील गरीब शेतकरी प्रतिभा प्रकाश पदरत यांनी त्यांच्या गोठ्यात बांधलेल्या गाईच्या वासरावर बिबट्याने हल्ला करून ठार केले. या प्रकाराने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
प्रतिभा पदरात यांनी आपल्या गोठ्यात गुरे बांधून ठेवली होती. मध्यरात्री अचानक गावात बिबटया आला आणि गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला करून वासराला खाऊन टाकले. प्रतिभा पदरत या सकाळी वाड्यात गेल्यावर ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी ही बाब पोलीस पाटील अनंत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. पोलीस पाटील यांनी म्हसळा वनविभाग कार्यालयास जाऊन सदरची घटना अधिकाऱ्यांना सांगून चौकशी व पंचनाम्याची मागणी करून नुकसान भरपाई मिळण्यासाठी विनंती केली. दरम्यान तालुक्यात अनेक वेळा अश्या घटना घडत असतात.