अलिबाग : महाराष्ट्र राज्य औषध परिषद (MSPC) द्वारे औषध माहिती केंद्र (DIC) मार्फत विविध ठिकाणी कार्यरत असणाऱ्या फार्मासिस्टना सक्षम करण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत त्यापैकी एक “स्मार्ट फार्मासिस्ट कोर्स”. या अंतर्गत महाराष्ट्र राज्य औषध निर्माण अधिकारी संघटना शाखा रायगडतर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र पोयनाड, ता. अलिबाग येथे रायगड जिल्ह्यातील शासकीय औषधनिर्माण अधिकारी यांच्यासाठी ‘स्मार्ट फार्मासिस्ट कोर्स 2.0’ चे आयोजन दि. 23 एप्रिल 2025 रोजी करण्यात आले. सदर कोर्समध्ये केइएम हॉस्पिटल मुंबईचे ज्येष्ठ हॉस्पिटल फार्मासिस्ट श्री. शीतल चंदन यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत रायगड जिल्ह्यातील 45 शासकीय औषधनिर्माण अधिकारी (हॉस्पीटल फार्मासिस्ट्स) यांना मार्गदर्शन केले. सदर प्रसंगी MSPC चे रायगड जिल्हा समन्वक संतोष घोडिंदे यांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वप्रथम काश्मीरमधील पहलगाम येथे आतंकवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर हार्टफुलनेस या पनवेल येथील योगा संस्थेमार्फत उपस्थित औषध निर्माण अधिकारी यांना योगा प्रशिक्षण तसेच योगाचे आपल्या धावपळीच्या जीवनातील महत्त्व यावर महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली.
रायगड जिल्हा औषधनिर्माण अधिकारी संघटनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य औषध निर्माण अधिकारी संघटना महाराष्ट्रचे कार्याध्यक्ष निलेश कार्लेकर, तसेच जिल्हा कार्यकारणी उपाध्यक्ष सूर्यकांत चौधरी, सचिव सुदेश पाटील, सहसचिव हर्षल वाटेगावकर, खजिनदार अपर्णा साजेकर, मार्गदर्शक संदिप घायाळ आणि जितू पाटील तसेच सुविधा आमले आदी मान्यवरांसह प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा परिषदेचे ॲडमिनिस्ट्रेटिव ऑफीसर डॉ. मिलिंद पाटील आणि प्राथमिक आरोग्य केंद्र पोयनाडच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजाता जाधव उपस्थित होत्या. सदर कार्यक्रम हा औषध निर्माण अधिकारी यांना रिफ्रेश करण्यासाठी आणि काळानुरूप बदलत्या औषध शैलीबद्दल महत्वपूर्ण माहिती देण्यासाठी आवश्यक होता आणि याचा फायदा ग्रामीण भागातील जनतेसाठी नक्की होईल असे मत या संघटनेच्या रायगड शाखेने व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद माहिती केंद्राचे चेअरमन गणेश बंगाळे यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. मनिषा विखे, जिल्हा औषध भंडारचे औषध निर्माण अधिकारी विकास पाटील, साथरोग अधिकारी डॉ. रोशन पाटील, कनिष्ठ सहाय्यक सचिन पाटील, औषध निर्माण अधिकारी वैशाली खर्जे, जितू पाटील, परशुराम कोठेकर आणि महाराष्ट्र राज्य औषध निर्माण अधिकारी संघटना रायगडची व्यवस्थापन कमिटी यांनी मोलाचे सहकार्य केले.