• Wed. Jul 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण वाहतूक पोलिसांची महामार्गांवर पार्किंग केलेल्या वाहनांवर विशेष मोहीम राबवून कारवाई

ByEditor

Apr 25, 2025

विठ्ठल ममताबादे
उरण :
नवीमुंबईचे वाहतूक पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक पोलिस आयुक्त वाहतूक विठ्ठल कुबडे यांच्या निर्देशाने उरण परिसर व एनएच ४-बी या महामार्गालगत व मुख्य रस्त्यावर पार्क होणाऱ्या अवजड वाहनांवर आळा घालण्यासाठी व त्यातूनच अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी नवीन उपक्रमाद्वारे विशेष मोहीम राबविण्यात आली होती.

या दरम्यान सीएफएस व एम. टी. यार्ड यांच्या बाहेर पार्किंग होणाऱ्या अवजड कंटेनर व मुख्य रस्त्यावर पार्किंग करण्यात येणारी वाहने यावर भारतीय न्याय संहिता २८५ नुसार ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाहतुकीस अडथळा करणाऱ्या वाहनांवर मोटर वाहन कायदा १२२/१७७ नुसार ३६३ कारवाया करण्यात आल्या आहेत. याशिवाय सतत वाहनांची वर्दळ असलेल्या महामार्गांवर व गोदाम परिसरातील रोडवर कोणत्याही प्रकारे अवजड वाहने पार्किंग होणार नाहीत.

याची खबरदारी वाहनचालकांनी घ्यावी. सर्व वाहने नेमण्यात आलेल्या अधिकृत पार्किंगमध्ये उभी करावीत. महामार्ग अथवा गोदामांच्या रोडवर कोणतेही वाहन उभे करण्यात आलेले निर्दशनास आल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल दहिफळे वाहनचालकांना केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!