क्रीडा प्रतिनिधी
अलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन व महाडच्या एसबीसी क्रिकेट अकॅडमीची युवा अष्टपैलू क्रिकेटपटू रोशनी पारधी हिची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पंधरा वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट संघात निवड झाली व त्यानंतर तिची निवड बीसीसीआय आयोजित इंटर झोन १७ वर्षाखालील मुलींच्या स्पर्धेत पश्चिम विभागासाठी निवड करण्यात आली आहे तसेच नुकतीच रोशनीची निवड महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेसाठी रायगड रॉयल्स संघात ऑक्शनद्वारे निवड झाली आहे.
पनवेल येथे रायगड जिल्ह्याचे युवा नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रोशनी पारधी हिचा क्रिकेट बॅट व किट देऊन सन्मान करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, रोशनी पारधी हिचे प्रशिक्षक आवेश चिचकर उपस्थित होते.
