• Tue. Jul 29th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अजित पवार यांच्या दौऱ्यात भास्कर जाधव सोबत, राजकीय वर्तुळात खळबळ

ByEditor

Apr 27, 2025

रत्नागिरी : उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हे अजित पवारांबरोबर होते. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. भास्कर जाधव हे एक काळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. शिवाय त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी ही स्विकारली आहे. पण सुनिल तटकरे यांच्या बरोबर झालेल्या वादामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली. त्यानंतर आता ते अजित पवारांबरोबर कोकण दौऱ्यात दिसले आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा होवू लागल्या आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या पाहणी दौऱ्यावेळी भास्कर जाधव हे अजित पवारांसोबत बघायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार येण्यापूर्वीच भास्कर जाधव कसबा इथे दाखल झाले होते. यावेळी भास्कर जाधव यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत हास्यविनोद सुद्धा केला.

भास्कर जाधव यांच्या भेटीवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही कुठला पक्ष म्हणून तिथे गेलो नव्हतो. आमच्या या भेटीचा वेगळा अर्थ लावू नका. मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो”, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. अजित पवार यांना पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी याबाबत उत्तर दिलं. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या पाहाणीसाठी अजित पवार हे रत्नागिरी जिल्ह्यातील कसबा इथं आले होते. इथं संभाजी महाराजांचे भव्य स्मारक होत आहे. याच ठिकाणी संभाजी महाराज राहीले होते. अजित पवार येणार हे माहित असल्याने कसबा इथं भास्कर जाधव हे दाखल झाले होते. त्यावेळी त्यांच्या बरोबर उद्योग मंत्री उदय सामंत ही होते. त्यांच्यातही हस्यविनोद रंगला होता. ही सर्व दृष्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. तसे पाहाता सामंत आणि जाधव यांच्यातूनही विस्तव जात नाही. तरीही ते एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!