विश्वास निकम
कोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कुंडलिका नदीवरील पुलाच्या पुढे कोलाड नजीक जुन्या पोलिस स्टेशनजवळ टँकरची कारला जोरदार धडक बसल्याने अपघात घडला.
शुक्रवार दि. २ मे २०२५ रोजी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास बडेलाल रामखिलयान सिंग यांने त्याच्या ताब्यातील टँकर क्र. एमएच ०४ एचएस ००८१ हा मुंबई-गोवा महामार्गावर अतिवेगाने चालवीत असतांना मारुती बलेनो कारला (कार क्र. युपी १६ सीवाय ४६१५) पाठीमागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला असुन या अपघातात मारुती बलेनो कारचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. घटनास्थळी कोलाड पोलिस ठाण्याचे सहा. फौजदार पाटील उपस्थित होते. टँकर चालक बडेलाल रामखिलवान सिंग याच्यावर कोलाड पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ४३ /२०२५, भा. न्या. संहिता २०२३चे कलम २८१ मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असुन अपघाताचा अधिक तपास कोलाड पोलिस ठाण्याचे सहा. फौजदार पाटील करीत आहेत.