क्रीडा प्रतिनिधी
अलिबाग : झुंझार युवक मंडळ पोयनाड ह्या संस्थेच्या ६३व्या वर्धापनदिनानिमित्त दि. १ मे २०२५ रोजी आयोजित व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने पै. अन्वर बुराण (माजी अध्यक्ष-झुंझार युवक मंडळ पोयनाड) स्मृतीचषक कबड्डी स्पर्धेत नवयुवक खिडकी संघाने झुंझार क्रीडा मंडळ पोयनाड संघाचा अंतिम सामन्यात पराभव करत स्पर्धेत अंतिम विजयी होण्याचा मान मिळवला. झुंझार क्रीडा मंडळ पोयनाड संघाला द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक अक्कादेवी बोरी संघ तर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला तो अंबिका क्रीडा मंडळ मळेघरचा संघ.
संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निर्देश डाकी याला उत्कृष्ट खेळाडू,विशाल चवरकर पब्लिक हिरो, उत्कृष्ट चढाई पुष्पम पाटील तर उत्कृष्ट पकड म्हणून तेजस मोकल यांना झुंझार युवक मंडळ पोयनाडचे सचिव किशोर तावडे, खजिनदार दिपक साळवी, क्रीडाप्रमुख नंदकिशोर चवरकर, सुजित साळवी, पंकज चवरकर, भूषण चवरकर, अजित चवरकर, किशोर जैन, कुलदीप पाटील, धर्मेश पाटील, देवेंद्र तावडे, अंकुश चवरकर यांच्या हस्ते रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.