अभय पाटील
बोर्ली पंचतन : येथील जनता शिक्षण संस्था संचालित श्री. नानासाहेब कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय बोर्ली पंचतन, श्रीवर्धन विद्यलयाचा एचएचसी परीक्षा फेब्रुवारी 2025चा एकूण निकाल 72.90% इतका लागला आहे. विद्यालयात प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मुलींनी पटकाविला.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी2025च्या परीक्षेचा निकाल नुकताच ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला असून बोर्ली पंचतन येथील श्री. नानासाहेब कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या निकालामध्ये प्रथम तीन क्रमांकाने वाणिज्य शाखेच्या अनुक्रमे करीना सुनील नाक्ती (74 .67%), ऋतुजा कमलाकर पड्याळ (73.67%), भक्ती श्रीकांत साखरे (72.33%) या विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. विद्यालयातून परीक्षेस एकूण 203 विद्यार्थी बसले होते, त्यातील148 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल 72.90 टक्के लागला आहे.
विद्यालयचा शाखानिहाय निकाल खालील प्रमाणे
विज्ञान शाखा
परीक्षेस बसलेले विद्यार्थी:- 45
परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी :- 45
निकाल टक्केवारी :- 100 %
विज्ञान शाखा प्रथम तीन विद्यार्थी
1) श्रवण प्रमोद वरणकर :- 70 .67%
2) प्रथम अभय पाटील :- 68.17%
3) सार्थक महेंद्र पाटील :- 61.67%
वाणिज्य शाखा
परीक्षेस बसलेले विद्यार्थी:- 80
परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी :- 78
निकाल टक्केवारी :- 97.50 %
वाणिज्य शाखा प्रथम तीन विद्यार्थी
1) करीना सुनील नाक्ती :- 74 .67%
2) ऋतुजा कमलाकर पड्याळ :- 73.67%
3) भक्ती श्रीकांत साखरे :- 72.33%
कला शाखा
परीक्षेस बसलेले विद्यार्थी:- 78
परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी :- 25
निकाल टक्केवारी :- 32.05 %
कला शाखा प्रथम तीन विद्यार्थी
1) धनश्री यशवंत गोवारी :- 57.83%
2) मनीष तुकाराम चोगले:- 56.33%
3) मानसी मुरलीधर चोगले:- 55.00%
उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे प्राचार्य बाबासाहेब यळमंते, सर्व मार्गदर्शक शिक्षक यांचे जनता शिक्षण संस्था विश्वस्त अध्यक्ष रविंद्र कुळकर्णी, सदस्य तथा चेअरमन महंमद मेमन तसेच सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले.