• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

जे. एम. म्हात्रे यांचा शेकापला अखेरचा ‘लाल सलाम’!

ByEditor

May 5, 2025

जे. एम. म्हात्रे, प्रीतम म्हात्रे ७ मे रोजी असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करणार

पत्रकार परिषदेत दिली माहिती

घन:श्याम कडू
उरण :
ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे आणि युवा नेते प्रीतम म्हात्रे यांनी आज पत्रकार परिषदेत भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा केली. ७ मे रोजी हा प्रवेश थाटात पार पडणार असून, अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत मोठे शक्तिप्रदर्शन होणार आहे.

या पत्रकार परिषदेला जे. एम. म्हात्रे, प्रीतम म्हात्रे तसेच आजी-माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दीर्घकाळापासून पक्षात डावललं जात असल्याच्या कारणाने जे. एम. म्हात्रे नाराज होते. आज या नाराजीचा उद्रेक झाला आणि त्यांनी थेट भाजपची वाट धरली. या प्रवेशामुळे शेकापच्या उरल्या-सुरल्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. म्हात्रे यांच्या बरोबर कोणकोण भाजपात जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शेकापचे पदाधिकारी मात्र आत्मविश्वासात

“नेते जातात, कार्यकर्ते नाही…आमचे कार्यकर्ते ठाम आहेत!” असा दावा शेकापच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. पण खरा निर्णय आता जनतेच्या कोर्टात होणार आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!