• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

एमसीए आंतरजिल्हा निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत रायगडचा थेट विजय

ByEditor

May 6, 2025

कोल्हापूर, सातारा संघाचा पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय

क्रीडा प्रतिनिधी
रायगड :
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरजिल्हा निमंत्रित सोळा वर्षाखालील मुलांच्या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धा सध्या रायगड जिल्ह्यात सुरू आहे. स्पर्धेतील “डी” गटातील रायगड, कोल्हापूर, सातारा, युनायटेड स्पोर्ट्स क्लब, वायएमसीए क्रिकेट क्लब व साऊथ झोन अश्या सहा संघांमध्ये एकूण पंधरा साखळी फेरीतील सामने रायगड जिल्ह्यातील रिलायन्स क्रिकेट मैदान नागोठणे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केटस रसायनी पाताळगंगा व छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण उलवे पनवेल येथील क्रीडांगणावर रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आले आहेत.

स्पर्धेतील पहिल्या सामन्यात उलवे येथील मैदानावर रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संघाने साऊथ झोन संघावर एक डाव व २३ धावांनी जिंकून विजयी सलामी दिली आहे. रायगडच्या पंकज इटकर यांनी सामन्यात दमदार फलंदाजी करत नाबाद १४६ धावांची खेळी करत शतक झळकावले. दुसरा सामना रसायनी पाताळगंगा येथील मैदानावर सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशन विरुद्ध वायएमसीए क्रिकेट क्लबमधील यांच्यात झाला. या सामन्यात सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संघाने वायएमसीए क्रिकेट क्लब संघावर पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय मिळवला. त्यात सातारच्या सुयश पडळकर यांनी १०८ धावा काढत शतक पूर्ण केले. तिसरा सामना रिलायन्स क्रिकेट मैदान नागोठणे येथे कोल्हापूर विरुद्ध युनायटेड क्रिकेट क्लब यांच्यात झाला. सामन्यात कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संघाने युनायटेड क्रिकेट क्लब संघावर पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय मिळवला आहे.

रायगड जिल्ह्यात पहिल्यांदाच एमसीएच्या आंतरजिल्हा निमंत्रित क्रिकेट स्पर्धा होत असल्याने रायगड जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सामने पाहण्यासाठी मैदानावर प्रेक्षकांची गर्दी होतांना दिसत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!