• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

IPL 2025 स्थगित, भारत-पाक तणावामुळे BCCI चा मोठा निर्णय, उर्वरित 16 सामने लांबणीवर

ByEditor

May 9, 2025

मुंबई : भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या संबंधांमुळे बीसीसीआयने आयपीएल २०२५ तूर्तास स्थगित करण्याचा निर्यण घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव गुरूवारचा पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समधील सामना रद्द करण्यात आला होता. त्यामुळे त्यानंतर आयपीएलचे सामने होणार की नाहीत असा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र आता बीसीसीआयने सर्व संघ मालकांसोबत चर्चा करून आयपीएल तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी, पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स सामना रद्द करण्यात आला होता. सुरक्षेच्या कारणांमुळे ब्लॅकआऊटची घोषणा करण्यात आली होती. प्रेक्षकांना तातडीने स्टेडियममधून बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे पुढील सामना होणार की नाही याबाबत साशंकता होती.

भारत-पाकिस्तानमधील तणावामुळे पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील धर्मशाला येथे खेळवला जाणारा सामना आधीच अहमदाबादला हलवण्यात आला होता. मात्र आता आयपीएलचे पुढील सामने तूर्तास खेळवले जाणार नाहीत. आयपीएलचे आतापर्यंत ५७ सामने झाले असून १६ सामने बाकी आहेत. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समधील सामना रद्द करण्यात आला होता. त्यामुळे आज होणारा आरसीबी आणि लखनऊनमधील सामना होणार की नाही याबाबत शंका होती. मात्र आता बीसीसीआयने घेतलेल्या निर्णयामुळे संपूर्ण आयपीएल स्पर्धा तूर्तास थांबवण्यात आली आहे.

भारताने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकड्यांना चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत. भारताने पाकिस्तानच्या एकाही लष्कराच्या तळाला धक्का न लावता दहशतवाद्यांचे तळ उडवून लावले होते. मात्र पाकिस्तानवाल्यांनी आपली लायकी दाखवली आणि भारताच्या सीमाभागांवर हल्ला केला. आपल्या लोकांवर हल्ला केल्यावर भारतीय लष्करानेही बाह्या सरसावल्या आणि पाकड्यांना चोख प्रत्युत्तर दिले.

दरम्यान, गुरूवारी रात्री पाकिस्तानने ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला पण भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने हा हल्ला परतावून लावला. या युद्धामुळे भारताने अंतर्गत खबरदारी घेतली असून सीमाभागांमध्ये ब्लॅकआऊट आणि देशातील २६ विमानतळे बंद करण्याचा निर्णय घेतला. याचा परिणाम आयपीएलच्या सामन्यांवरही झाला. याबाबत बीसीसीआयकडून अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!