• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मासेमारी करणाऱ्या दोन एलईडी बोटींवर करंजा बंदरात कारवाई

ByEditor

May 10, 2025

अनंत नारंगीकर
उरण :
बंदी असतानाही करंजा बंदर परिसरात एलईडी पद्धतीने मासेमारी करणाऱ्या दोन बोटीवर मत्स्यव्यवसाय विभागाच्या परवाना अधिकाऱ्यांनी शुक्रवारी छापा टाकत कारवाई केली. यावेळी दोन बोटीवरील थ्री फेज जनरेटर ४०००, ३००० वॅट एलईडी बल्ब जप्त करण्यात आले आहे.

केंद्र आणि राज्य सरकारची एलईडी पद्धतीने मासेमारी करण्यास बंदी असतानाही अनेक मासेमारी बोटी या एलईडी तंत्राचा वापर करून खोल समुद्रात मत्स्यव्यवसाय आयुक्तालयाच्या अधिकारी वर्गाच्या आशिर्वादाने मासेमारी करतात. या एलईडी पद्धतीने मासेमारी करताना मोठ्या माशा बरोबरच लहान जीवही पकडले जातात. लहान मासे मृत झाल्याने त्यांची पैदास होणे थांबते आणि यामुळेच अनेक माशांच्या जाती ह्या नष्ट झाल्या आहेत. यामुळे शासनाने एलईडी मासेमारीला बंदी घातली आहे.

मात्र, बंदी घातली असताना करंजा बंदर परिसरात मत्स्यव्यवसाय विभागाच्या कृपाशीर्वादाने मोठ्या प्रमाणात मासेमारी सुरू आहे. सध्या पाकिस्तान व भारत देश यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने पोलीस, कस्टम यंत्रणेने सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून समुद्रात गस्त वाढविल्याने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी मासेमारी करणाऱ्या बोटीवर छापा टाकला. यामध्ये पेण दादर येथील अनिल जोशी यांची विठ्ठल माऊली (IND-MH-7-MM-1941) या नौकेची तपासणी केली असता एक जनरेटर 3 फेज व पाण्यातील एलईडी बल्ब 2000 चे दोन व पाण्यातील 4000 चे दोन बल्ब हे साहित्य आढळून आले. तर उरण करंजा कोढरीपाडा येथील माऊली तुळजाई एकविरा (lIND-MH-7-MM-3184) यांच्या नौकेची तपासणी करून एक जनरेटर 3 फेज, पाण्यातील चार एलईडी लाईट जप्त करण्यात आले आहे. सदर जप्त करण्यात आलेल्या बोटी करंजा बंदरात ठेवण्यात आल्या आहेत.

गस्तीवर असताना दोन बोटीवर कारवाई केली आहे. पेण दादर आणि उरण करंजा येथील आहेत. त्या बोटी करंजा बंदरात ठेवण्यात आल्या. जप्त केलेले सामान अलिबाग येथे नेण्यात आले. त्याचे प्रस्ताव तयार करून मत्स्य उपायुक्तांकडे पाठवला आहे.
-सुरेश बागुलगावे
परवाना अधिकारी, उरण मत्स्यव्यवसाय विभाग

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!