सलीम शेख
माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर येथील डायव्हरजनजवळ आयशर टेम्पो व छोटा टेम्पोत यांच्यात अपघात होऊन ८ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. ११ मे रोजी सकाळी ५.३० वा. च्या सुमारास आरोपी नरेंद्रसिंग रजपूत (३०) याने त्याचे ताब्यातील आयशर टेम्पो (क्र. जीजे १८ बीव्ही ७१५१) हा गोवा बाजुकडुन मुंबई बाजुकडे चालवित जात असतान मौजे इंदापूर येथील महामार्गावर असलेल्या डायव्हर्जनने न वळता सरळ जाऊन मुंबई बाजुकडुन येणाऱ्या छोट्या टेम्पोला (क्र. एमएच ४७ एएस ५८८९) समोरुन धडक देऊन अपघात केला. या अपघातात ८ जण जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पो. नि. निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ह. फडताडे करीत आहेत.
