• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पाली नगरपंचायतमध्ये मोठी घडामोड; नगराध्यक्षासह 4 नगरसेवक अपात्र

ByEditor

Aug 5, 2023

वार्ताहर
पाली :
शुक्रवार, दि. ४ ऑगस्ट रोजी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी पाली नगराध्यक्षा व 4 नगरसेवकांच्या आपत्रेचा आदेश दिला. नगराध्यक्ष निवडणुकीत पक्षाचा व्हीप झुगारल्याने शिवसेनेच्या नगरसेविका कल्याणी दपके व प्रतीक्षा पालांडे, शेकापचे नगरसेवक विनायक जाधव व नगराध्यक्षा प्रणाली शेळके हे 4 जण अपात्र झाले आहेत. तर शिवसेनेचे सचिन जवके हे नगरसेवक तिसरे अपत्य असल्याने अपात्र झाले आहेत.

जानेवारी 2022 मध्ये पाली नगरपंचायतची पहिली निवडणूक झाली. नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर येथे अनेक उलथापालथ होत आहेत. नोव्हेंबर 2022 मध्ये नगरपंचायतच्या पहिल्या नगराध्यक्षा गीता पालरेचा यांनी राजीनामा दिल्याने नगराध्यक्ष पद रिक्त होते. या रिक्त नगराध्यक्ष पदाची निवडणूक विशेष सभेचे आयोजन करून 14 डिसेंबर 2022 मध्ये घेण्यात आली.

यावेळी शेकापच्या प्रणाली पाटील-शेळके यांनी बंडखोरी करत पक्षाचा व्हीप झुगारून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. यावेळी त्यांना 11 मते व शेकापचे आरिफ मणियार यांना 5 मते मिळाली आणि नगराध्यक्षपदी प्रणाली शेळके निवडून आल्या. यावेळी शेकापच्या प्रणाली पाटील-शेळके यांनी बंडखोरी करत पक्षाचा व्हीप झुगारून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. यावेळी त्यांना 11 मते व शेकापचे आरिफ मणियार यांना 5 मते मिळाली आणि नगराध्यक्षपदी प्रणाली शेळके निवडून आल्या.

नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना व शेकापने आपल्या पक्षातील नगरसेवकांना व्हीप (पक्षादेश) काढला होता. मात्र शिवसेनेच्या 4 नगरसेवकांपैकी दोघांनी व्हीप झुगारून प्रणाली पाटील-शेळके यांना तर दोघांनी आरिफ मणियार यांना मतदान केले. तर शेकापच्या 3 पैकी दोघांनी व्हीप झुगारून प्रणाली शेळके (यामध्ये प्रणाली शेळके स्वतः) यांना तर एकाने आरिफ मणियार यांना मतदान केले होते. त्यांनतर हे प्रकरण रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे गेल्यावर जिल्हाधिकारी यांनी शुक्रवारी (ता.4) या 4 नगरसेवकांच्या आपत्रेचा आदेश दिला.

दरम्यानच्या काळात नगरसेविका कल्याणी दपके यांनी नगरसेवक सचिन जवके यांच्या विरोधात 3 अपत्य असूनही निवडणूक लढविल्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी अर्ज केला होता. त्यानुसार चौकशी व सुनावणी नंतर सचिन जवके यांच्या आपत्रतेचा आदेश सुद्धा जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!