प्रतिनिधी
बोर्ली पंचतन : जनता शिक्षण संस्थेच्या श्री. मोहनलाल सोनी विद्यालय, बोर्ली पंचतन, ता. श्रीवर्धन प्रशालेचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2025 चा एकूण निकाल 95.49% इतका लागला आहे.
मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल ऑनलाइन आज जाहीर करण्यात आला असून यामध्ये बोर्ली पंचतन येथील जनता शिक्षण संस्था संचालित श्री. मोहनलाल सोनी विद्यालय, बोर्ली पंचतन, ता. श्रीवर्धन, रायगड प्रशालेचा एकूण निकाल 95.49% इतका लागला. विद्यलयातून परीक्षेस 111 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 106 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यामध्ये प्रथम क्रमांक मनस्वी विकास चांदोरकर (93.00%), द्वितीय क्रमांक प्रेम विक्रांत शिरकर (86.60%) तर नील दशरथ रोटकर (84.60%) या विद्यार्थ्यांनी पटकाविला. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांचे जनता शिक्षण संस्था, विद्यालय यांचेवतीने अभिनंदन करण्यात आले.
