प्रतिनिधी
नागोठणे : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला असून यात येथील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या एस. डी. परमार स्कुलचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
शाळेत निल प्रकाश कुथे ८८ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आला आहे. तर अथर्व रवींद्र मेस्त्री ८४.८० व करण रवींद्र मनवे ८४.४० टक्के गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय आले आहेत. या परीक्षेत १९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. परीक्षेत प्रविष्ट सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे भा.ए.सो.चे संस्थापक-अध्यक्ष किशोरभाई जैन, खजिनदार सुरेश जैन यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.