विनायक पाटील
पेण : चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया रायगड, पेण संस्थेच्या वतीने ५ हजार प्रतिपालित व अप्रतिपालीत मुलांना शालेय आणि जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. तसेच त्यांची वैद्यकीय तपासणीही चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया या संस्थेच्या उत्कर्ष नगर येथील कार्यालयात संस्थेचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


यावेळी आलेल्या मुलांना व पालकांना चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया संस्थेच्या सदस्यांनी शिक्षणाचे महत्व समजावून सांगितले व इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी कोणत्या संधी उपलब्ध आहेत याचीही माहिती दिली तसेच हि मदत कुठून केली जाते, कोण करतात आणि का करतात या संदर्भातही पालकांना व विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. तसेच पालकांचे मुलांशी वर्तन कसे असावे व त्यांनी मुलांच्या अभ्यासाकडे जातीने लक्ष देणे किती गरजेच आहे याबद्दल त्यांना समजावून सांगण्यात आले. पालकांनीही चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया या संस्थेचे त्यांच्याकडून होणाऱ्या या मदतीसाठी आभार मानले.

