• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

बोरघर आदिवासीवाडीत गळ्यावर कोयत्याने वार करून वृद्धाची हत्या!

ByEditor

May 19, 2025

सलीम शेख
माणगाव :
तालुक्यातील मौजे बोरघर आदिवासीवाडी येथे गळ्यावर कोयत्याने वार करून वृद्धाची हत्या केल्याची घटना रविवार दि. १८ मे २०२५ रोजी रात्री ८.४० वा.च्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या घराच्या समोर घडली. या घटनेची फिर्याद चंद्रकांत दौलत मुकणे (वय -१९ ) रा. बोरघर आदिवासीवाडी ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, घटनेतील फिर्यादी चंद्रकांत मुकणे हे घरात एकत्रित जेवण करीत असताना आरोपी अक्षय चंद्रकांत मुकणे (वय – २५, रा. बोरघर आदिवासीवाडी) याने साक्षीदार शाबी दौलत मुकणे (रा. बोरघर आदिवासीवाडी) यांना शिवीगाळ केली म्हणून साक्षीदार यांनी विचारले असता आरोपी अक्षय मुकणे हा समोर येवुन अरेरावी करू लागला. मयत भिमसेन दगडू मुकणे (वय – ७० वर्ष) यांनी आरोपी अक्षय याला काठीने मारहाण केली. त्यावेळी आरोपीने त्याचे कमरेला असलेल्या कोयत्याने फिर्यादी यांचे आजोबा भीमसेन मुकणे यांच्या गळ्यावर वार करून गंभीर दुखापत केली. त्यात त्यांचा मृत्यु झाला.

या घटनेची माहिती समजताच तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी, माणगाव पो. नि. निवृत्ती बोऱ्हाडे, सपोनि बेलदार, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, काळे यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.नं.१०२/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), ३५२ प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात येऊन सदर घटनेचा अधिक तपास सपोनि बेलदार हे करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!