• Fri. Jun 6th, 2025 8:49:06 AM

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

एमसीए आयोजित आंतरजिल्हा पंधरा वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेसाठी रायगडचा संघ जाहीर

ByEditor

May 24, 2025

क्रीडा प्रतिनिधी
रायगड :
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या आंतरजिल्हा पंधरा वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेसाठी काल रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा संघ जाहीर करण्यात आला. खोपोलीच्या निशिता विठलानी हिच्याकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले असून रायगड जिल्ह्याचा संघ २९ मेपासून एमसीएच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरजिल्हा मुलींच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणार आहे.

रायगड जिल्ह्याच्या संघ पुढील प्रमाणे :

निशिता विठलानी (कर्णधार), ब्रताती राय (उपकर्णधार), मधुरा बाबर (यष्टिरक्षक), जिज्ञासा कडू (यष्टिरक्षक), निर्मयी चुनेकर, श्रीजा वाघमोडे, स्तुती विठलानी, आरोही लोखंडे, प्रियांसी गायकवाड, आरुषी जाधव, ज्ञानेश्वरी येरूणकर, काव्या माने, सान्वी कुमार, वैदेही वावेकर.

राखीव खेळाडू : स्वरा साळुंके, गीतांजली शर्मा, दिव्यांका धनावटे, प्राची शिंदे, वेदिका धनानी, अद्विता जाधव, वैष्णवी जाधव, दुर्वश्री साळुंके, त्रिशा सिंग.

वरील निवडलेला संघ पहिल्या दोन सामन्यांसाठी असणार आहे. मुलींच्या निवड चाचणी शिबिराचे आयोजन खारघर येथील बी. पी. पाटील क्रिकेट अकॅडमी येथे करण्यात आले होते. शिबिरामध्ये मुख्य प्रशिक्षक व निवडकर्ता म्हणून नयन कट्टा व विनय पाटील यांनी काम पाहिले. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश पाटील, सहसचिव जयंत नाईक, सदस्य प्रदीप खलाटे यांनी निवड चाचणी व प्रशिक्षण शिबिरासाठी उपस्थित राहून खेळाडूंना मार्गदर्शन केले. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदिप नाईक यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी संघाला स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!