• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

भादाव येथून विवाहिता बेपत्ता!

ByEditor

Aug 5, 2023

सलीम शेख
माणगाव :
माणगाव नगरपंचायत हद्दीतील भादाव गावातील आपल्या राहत्या घरातून विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना दि. २ ऑगस्ट २०२३ रोजी घडली आहे. याबाबतची फिर्याद महिलेचा पती रमेश गोपाळ पवार (वय-२७) रा. भादाव ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, घटनेतील फिर्यादी रमेश गोपाळ पवार यांची पत्नी सुवर्णा गोपाळ पवार (वय-२७) वर्णन रंग सावळा, उंच सुमारे ५.५ फूट, अंगाने मजबूत, अंगात पंजाबी ड्रेस तसेच पायात निळ्या रंगाची चप्पल व पैंजण, दोन्ही गालावर टिम्बसारखे गोंदलेले हि महिला दि. २ ऑगस्ट २०२३ रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास आपल्या भादाव गावातील राहते घरातून कोणाशी काहीएक न सांगता निघून गेली असून ती बेपत्ता झाली आहे. तिच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतल्यावर ती हरविल्याची तक्रार माणगाव पोलीस ठाण्यात दिली. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात मनुष्य मिसिंग रजि.नं. २५/ २०२३ प्रमाणे दाखल करण्यात आली आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री. पवार हे करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!