मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे जयंत पाटील हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाल्यास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासाठी हा दुसरा सर्वात मोठा धक्का असणार असल्याचं सांगितलं जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कालपासून पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी जयंत पाटील यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. आज सकाळीच ही भेट झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील जेडब्ल्यू मेरिएट हॉटेलमध्येच जयंत पाटील यांची अमित शाह यांच्याशी भेट घडवून आणल्याची चर्चा आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयंत पाटील यांनी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. आज सकाळी जे. डब्ल्यू मॅरीएट हॉटेलमध्ये शाह आणि जयंत पाटील यांची भेट घेतल्याचं सांगितलं जातं. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बंडखोर गटाचे प्रमुख अजित पवार यांनी या दोन्ही नेत्यांची भेट घडवून आणण्यासाठी मध्यस्थी केल्याचं सांगितलं जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्यातील भाजापाचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनी फोन करुन जयंत पाटलांना बोलावून घेतलं. या भेटीमुळे आता जयंत पाटील हे भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.
शरद पवारांची भेट
जयंत पाटील यांनी अमित शाहांची भेट घेतल्यानंतर ते मुंबईला रवाना झाले. त्यांनी सकाळीच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील ‘सिव्हर ओक’ या निवासस्थानी भेट घेतली. या भेट सत्रामुळे अजित पवार वेगली राजकीय भूमिका घेणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.