वार्ताहर
पाली : रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान तर आहेच, परंतु ती देशसेवाही आहे. रक्त देऊन आपण एखाद्या व्यक्तीला जीवनदान देत असतो, ही बाब आपल्या आयुष्यात खूप श्रेष्ठ ठरते. त्यामुळेच ही सामाजिक जाणीव आणि गरज लक्षात घेऊन श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली, रुधिरसेतू सेवा संस्था पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक १५/०६/२०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत भक्त निवास क्र. १ येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जास्तीत जास्त दात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली तर्फे करण्यात आले आहे.
श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली, रुधिरसेतू सेवा संस्था यांच्यावतीने १५ जून रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
