• Sat. Jun 7th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चोंढी येथे किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांच्या हस्ते वृक्षारोपण

ByEditor

Jun 5, 2025

अब्दुल सोगावकर
सोगाव :
दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरण विषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे. याच हेतूने गुरुवार, दि. ५ जून २०२५ रोजी किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच पिंट्या गायकवाड यांनी इतर सहकारी यांच्यासह चोंढी येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात विविध प्रकारच्या जांभूळ, आंबे, फणस व इतर फळझाडांची व विविध प्रकारच्या वृक्षरोपांची लागवड केली.

यावेळी वृक्षारोपण करताना किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांच्यासोबत उपसरपंच मिलिंद पडवळ, अमिता वाघे, कल्पिता आमले, नूतन थळे, महेश नाईक, भरत मेंकूदळे इतर मान्यवर उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!