• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कोलाड आंबेवाडी नाक्यावर अज्ञात चोरट्यांनी केले मोबाईल लंपास

ByEditor

Aug 6, 2023

विश्वास निकम
गोवे-कोलाड :
कोलाड आंबेवाडी नाक्यावर शुक्रवारी ४ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास एक खळबळजनक घटना घडली असून सदरच्या घटनेत एका आज्ञात चोरट्याने दुकानदाराचे २,१९,५०० रुपये किंमतीचे विविध प्रकारच्या कंपनीचे मोबाईल ठेवलेली पिशवीच लंपास केल्याने कोलाड आंबेवाडी नाक्यावर एकच खळबळ उडाली आहे. सदरच्या घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलिस उपनिरीक्षक ए. एस. साबळे तसेच त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली.

याबाबत कोलाड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवा सुबिर करमोकर (वय ३०, रा. रूम नं. ४०२ स्वामी हिरीटेज ए विंग सेवा दल आळी रोहा, रायगड) यांचे कोलाड आंबेवाडी नाक्यावरील त्यांचे न्यु टाईम सेंटर अन्ड मोबाईल दुकानामधून वरील किमतीचे मोबाईल तीन पांढऱ्या रंगाची कापडी पिशवी त्यावर विमल असे लिहीलेले यामध्ये ठेऊन त्या कापडी पिशव्या दुकानामधून बाहेर घेऊन येऊन दुकानाचे शटर लावून त्या पिशव्या दुकानाच्या व्हरांड्यात ठेऊन समोरील रोडवरील असलेल्या गाडीचे लॉक उघडण्याकरीता गेले असताना त्यापैकी एक कापडी पिशवीमधील वरील वर्णनाचे व किमतीचे १६ मोबाईल असा एकूण २,१९,५०० रुपयाचा माल खबर देणाऱ्याच्या संमतीशिवाय कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करून घेऊन गेला. याबाबत कोलाड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून कोलाड पोलीस निरिक्षक ए. एस. साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तापसिक अंमलदार एन. डी. चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!