गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्यात महसूल सप्ताह निमित्त एक हात मदतीचा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये बोर्लीपंचतन हद्दीतील दरडग्रस्त गावांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये हरवित व कुडगाव येथील आदिवासी बांधवांना कांदा, बटाटे, तेल, तांदूळ, चहापत्ती, हळद, मिरची पावडर, मीठ, धनापावडर, डाळ, वटाणा, साखर अशा जीवनावश्यक खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांच्याकडून महत्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. तसेच नायब तहसीलदार प्रथमेश भुर्के, अधिकारी केमनाईक, मंडळाधिकारी काटकर व तलाठी दत्ता कर्चे, मिलिंद पुट्टेवाड व निलेश पवार तसेच ग्रामसेवक गोवारी आणि उपसरपंच हवालदार यांच्या उपस्थितीत स्तुत्य उपक्रम पार पडला.