विनायक पाटील
पेण : अखिल भारतीय मराठा महासंघाची कार्यकारणी जाहीर झाली असून कोकण विभागीय अध्यक्ष प्रवीणभाऊ पवार व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने पेण तालुका सरचिटणीस पदी संजय कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संजय कदम यांचे मराठा समाज, मित्रपरिवार तसेच सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
संजय कदम हे सामाजिक कार्यकर्ते असून समाजाप्रती आपलं काहीतरी देणं आहे या भावनेने नेहमीच सक्रिय असतात. ते प्रामाणिक व मनमिळावू स्वभावाचे असल्याने सर्वांना हवे हवेसे वाटतात. माझ्यावर विश्वास ठेवून अखिल भारतीय मराठा महासंघाने पेण तालुका सरचिटणीस पदाची जबाबदारी दिले आहे ती मी पूर्णपणे पार पाडणार असून संघटना वाढवण्यासाठी नेहमीच सक्रिय राहणार असल्याचे संजय कदम यांनी बोलताना सांगितले. तसेच समाज उपयोगी उपक्रम राबवून समाजाच्या हिताचे काम करणार असल्याचेही सांगितले.
