• Mon. Jan 26th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अहमदाबाद विमान अपघातात 241 प्रवासी दगावले, फक्त 1 जण वाचला

ByEditor

Jun 12, 2025

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचं बोईंग 787 हे विमान पडलं. या अपघातग्रस्त विमानातील सर्व प्रवासी दगावले असून यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचादेखील समावेश आहे. या घटनेनंतर देशभरातून शोक व्यक्त केला जातोय. दरम्यान या अपघातामध्ये 1 व्यक्ती वाचल्याचे वृत्त समोर आले आहे. कोण आहे ही व्यक्ती? 241 प्रवासी दगावले असताना ही व्यक्ती कशी वाचली? हा प्रवासी कोणत्या सीटवरुन प्रवास करत होता? असे अनेक प्रश्न विचारले जातायत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

हे विमान दिल्लीहून अहमदाबाद व्हाया लंडन असा प्रवास करणार होतं. धक्कादायक बाब म्हणजे उड्डाण करताच अवघ्या 15 किमी अंतरावरच मेघानी रहिवाशी परिसरात विमान कोसळलं आहे. अहमदाबाद विमान अपघातानंतर आपत्कालीन सेवांवर देखरेख करण्यासाठी चार आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही टीम आरोग्य प्रधान सचिव धनंजय द्विवेदी यांच्या नेतृत्वाखाली काम करेल. अपघातस्थळी आणि संबंधित ठिकाणी समन्वित मदत, बचाव आणि वैद्यकीय प्रतिसाद सुनिश्चित करण्यासाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना विशेष जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. गांधीनगरहून विमान अपघातस्थळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) तीन तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये 90 जवानांचा समावेश आहे. वडोदराहून आणखी तीन तुकड्या पाठवण्यात येत आहेत.

रमेश विश्वास कुमार असे या वाचलेल्या प्रवाशाचे नाव असून तो 40 वर्षांचा आहे. अहमदाबादमधील असरवा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहेत. अहमदाबादचे पोलिस आयुक्त जीएस मलिक यांनी वाचलेल्या प्रवाशाची माहिती दिली आहे. पोलिसांना सीट 11ए मध्ये एक जिवंत प्रवासी सापडलाय. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांच्या संख्येबद्दल अद्याप काहीही सांगता येत नाही. विमान निवासी भागात कोसळल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी माहिती पोलिसांनी एएनआयला दिलीय.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!