• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरण; उरण तालुका नाभिक समाज आक्रमक

ByEditor

Aug 6, 2023

पोलीस उपनिरीक्षक संजय राठोड यांना श्री संतसेना महाराज नाभिक सामाजिक संस्थेच्यावतीने निवेदन

विठ्ठल ममताबादे
उरण :
ओमळी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथील नाभिक समाजाची कु.निलीमा सुधाकर चव्हाण ही अतिशय गरीब कुटुंबातील कन्या दापोली येथील भारतीय स्टेट बँकेत नोकरीस होती. शनिवार दि. २९ जुलै २०२३ रोजी बँकेची सुट्टी झाले नंतर घरी येत असतांना ती अचानक बेपत्ता झाली. त्यानंतर तिचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत जवळच्या खाडीत मंगळवार, दि.१ ऑगस्ट २०२३ रोजी सापडला. निलिमा चव्हाण हीच्या संशयास्पद मृत्युची पोलीस प्रशासनाने व महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने तातडीने सखोल चौकशी करून तपास लावावा. असे अमानुष व अमानवी कृत्य करणारे संशयीतांचा तपास होऊन संशयीताला कठोर शासन करावे अशी मागणी नाभिक समाजाची सर्वात प्रभावी व आक्रमक संघटना असलेल्या श्री संतसेना महाराज नाभिक सामाजिक संस्था उरण तर्फे उरण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय राठोड यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय राठोड यांनी नाभिक समाजाच्या भावना तातडीने वरीष्ठांपर्यंत पोहचवाव्यात असेही निवेदनात उल्लेख आहे.

यावेळी श्री संतसेना महाराज नाभिक सामाजिक संस्था उरणचे अध्यक्ष विनोद पवार, उपाध्यक्ष विजय जाधव, खजिनदार शैलेश पंडित, सेक्रेटरी रामचंद्र शिंदे, सदस्य संदिप कृष्णा जाधव, प्रदिप पंढरीनाथ मुकादम, संजय दत्तात्रेय साळुंखे, शेखर नारायण शिंदे, रविंद्र श्रीकांत मुकादम, शरद सुधाकर घाडगे, संगिता दिलीप जाधव, दिपाली दिवाकर शिंदे, सारिका शैलेश पंडित, ज्येष्ठ सल्लागार प्रमोद यशवंत मुकादम, मधुकर धनाजी चव्हाण यांच्यासह तालुक्यातील समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!