• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नागोठणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना शालेय उपयोगी वस्तुंचे वाटप

ByEditor

Aug 6, 2023

मनसेच्या माथाडी कामगार सेनेचा उपक्रम

किरण लाड
नागोठणे :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माथाडी कामगार सेनेच्यावतीने नागोठणे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना शालेय उपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले.

प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे मनसेचा या ब्रीदवाक्या
प्रमाणे सामाजिक बांधिलकी म्हणुन एखादयाला दिलेला शब्द पाळणे हा मनसेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा स्वभाव आहे. काही दिवसापूर्वी मनसेच्या माथाडी कामगार सेनेच्यावतीने नागोठणे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय वस्तुंचे वाटप करण्यात आले होते. त्यावेळी तेथील मुख्याध्यापकांनी शाळेमध्ये शालेय उपयोगी वस्तुंची कमतरता आहे ही बाब मनसे सैनिकांना लक्षात आणून दिल्यानंतर मनसेच्या माथाडी कामगार सेनेने ही महत्वाची बाब ओळखुन जोगेश्वरी नगर येथील शाळेला विविध वस्तु ठेवण्यासाठी एक अद्ययावत कपाट तसेच नागोठणे येथील कचेरी शाळेला एक सुसज्ज कपाट तसेच शाळेत शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला शुध्द पाणी पिण्यासाठी वाॅटर फिल्टर भेट देण्यात आले.

या सुंदर सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमासाठी मनसेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड, मुंबई येथील माथाडी कामगार सेनेचे नेते महेश पंडित, दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुबोध जाधव, माथाडी कामगार सेनेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते संतोष सातोस्कर, जयंत कदम, सामाजिक कार्यकर्त्या रुपा पंडित, मलाया पंडित, रोहा तालुका मनसेचे सचिव साईनाथ धुळे, रोजगार तथा स्वयंरोजगार विभागाचे जिल्हा संघटक प्रल्हाद पारंगे, मनसेच्या महिला आघाडीच्या दीपश्री गुरव-घासे, मनसे महिला सैनिक शीतल कदम, नागोठणे मनसे शहर उपाध्यक्ष पवन जगताप, उद्योजक प्रभाकर तांडेल तसेच ज्यांच्या विशेष पुढाकाराने हा शैक्षणिक कार्यक्रम घडुन आला ते मनसेचे माथाडी कामगार सेनेचे विभाग अध्यक्ष नरेश भंडारी व मनसे सैनिक, शालेय शिक्षिका, मुख्याध्यापिका, विद्यार्थी वर्ग, पालक वर्ग आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!