• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अमृत फाऊंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थिनीचा गौरव; उच्च शिक्षणासाठी लॅपटॉप भेट

ByEditor

Jun 19, 2025

प्रतिनिधी
अलिबाग :
अमृत फाऊंडेशनच्यावतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाला संस्थेच्या मुख्य विश्वस्त अश्विनी धर्मेंद्र वर्तक यांची विशेष उपस्थिती लाभली होती.

या सोहळ्यात आवास, सासवणे, धोकवडे हितवर्धक मंडळ अंतर्गत येणाऱ्या बाबासाहेब नाजूरे हायस्कूल, आवास येथील विद्यार्थिनी कु. संतोषी कोळी हिचा विशेष सत्कार करण्यात आला. नुकत्याच जाहीर झालेल्या १२ वीच्या परीक्षेत तिने ८२% गुण मिळवत यश संपादन केले.

कु. संतोषीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अमृत फाऊंडेशनचे सह विश्वस्त दर्शन वाकडे तसेच अमृत फाऊंडेशनच्या इतर विश्वस्तांनी तिला पुढील शिक्षणासाठी लॅपटॉप भेट देत तिला प्रोत्साहन दिले. या उपक्रमातून संस्थेने गुणवत्तेचा सन्मान करत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!