मुंबई : राज्यातून ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण तो संपणार नाही. ठाकरेंना संपवायला निघालेल्यांचा नामोनिशाणही ठेवणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. कम ऑन किल मी… हा नाना पाटेकरांच्या प्रहार चित्रपटातील डॉयलॉग मारत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि भाजपला जाहीर आव्हान दिलं. मुंबई यांच्या मालकाच्या घशात घालण्यासाठी भाजप मराठी माणसाला एकत्र येऊ देत नाही. पण राज्याच्या मनात जे आहे तेच मी करणार असं सांगत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या मनसेसोबत युतीचे संकेत दिले.
शिवसेना अजूनही तरुण आहे अजून ही तरुणच राहणार आहे. तिकडे चोरांचा बाजार भरला होता. पहिल्या मेळाव्याच्या वेळी बाळासाहेब यांनी शिवाजी पार्कत मेळावा घेतला होता. त्यावेळी मी माझ्या माँच्या मांडीवर बसलो होतो. राजकारणात ज्यांना पोरं होतं नाहीत ते आमच्यावर टीका करतात. तुला पोर होत नाहीत त्याला आम्ही काय करू? किती पाहिजे आहेत तेवढी पोर घे. भाजपला स्वतःची पोरं नाहीत त्यामुळे त्यांना अशी घ्यावी लागतात. ते आपल्याला हिंदुत्व शिकवत आहेत. ज्या वल्लभ भाई पटेल यांनी भाजपवर बंदी आणली त्यांचाच पुतळा सरदार वल्लभ भाई पटेल यांचा पुतळा बांधण्याची वेळ आली. एवढी माणसं चोरली, पक्ष चोरला, वडील चोरले तरी उद्धव ठाकरे संपत कसा नाही? असा प्रश्न त्यांना पडला असेल. पण शिवसैनिकांनी रक्त आटवून ही शिवसेना उभारली आहे. पैसे फेकून नव्हे तर कष्ट करून ही संपत्ती जमवली आहे. दुसरीकडे चोरांचा बाजार सुरू आहे.
अरे तुझा जीव किती, बोलतो कुणावर? नितेश राणेंवर टीका
उंची पेग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा, डोळे कुणासारखे ते माहिती नाही. अरे तुझा जीव किती, तू बोलतो किती? तुझ्या वडिलांची पार्श्वभूमी काय? एक कुणीतरी बाप ठरवं आणि मग बोल असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर टीका केली.
मनसेसोबत युतीवर उद्धव ठाकरेंचे मोठं वक्तव्य
कार्यकर्त्यांच्या आणि राज्याच्या मनात जे आहे तेच मी करणार. पण हे होऊ नये म्हणून यांच्या मालकाचे लोक इकडे तिकडे, हॉटेलमध्ये भेटी घेत आहेत. मुंबई पुन्हा मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर यांच्या मालकाचे काय होणार? मुंबईत मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून हे प्रयत्न करत आहेत. मुंबई आम्हचीच. ठाकरे ब्रँड संपवायला गेला तर तुमचे नामोनिशाण ठेवणार नाही.
हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही
हिंदी सक्तीचा करण्याची गरज काय? हिंदीला आमचा विरोध नाही, पण हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही. हिंदी सक्ती करायची तर ती गुजरातमध्ये करा. निवडणुकीच्या तोंडावर मराठी आणि अमराठीमध्ये भांडण लावण्याचा कार्यक्रम भाजपने केला. म्हणजे हे भ्रष्टाचार करायला मोकळे.
तुमच हिंदुत्व काय आहे हे भाजपला मला विचारायचे आहे. सिंदूर वाटणाऱ्या त्या भाजप नेत्याला चाबकाने फोडायला हवे. कर्नल कुरेशी यांना पाकिस्तानची बहीण म्हणतो. अशा अवलादी भाजपच्या आहेत. ट्रम्प फोन आल्यानंतर यांचा आवाज गेला. वॉर रुखवा दी पापा. चार अतिरेकी आत आले कसे? संरक्षण मंत्री, गृहमंत्री गेले कुठे? पातळात गेले, आकाशात गेले की भाजपमध्ये गेले? आता केवळ दाऊदला पक्षात घायच बाकी आहे. भाजपने जेलच्या बाहेर सदस्य नोंदणीसाठी स्टॉल टाकले आहेत. आधी भ्रष्टचाराचे आरोप केले, एसआयटी लाऊ म्हणाले. आता कुठे गेली एसआयटी… एसटीत गेली की काय? विधानसभेला त्यांनी बटेंगे तो कटेंगे नारा दिला, हिंदू-मुस्लिम केलं. आता हिंदू-हिंदू मध्ये मारामाऱ्या होतील अशी परिस्थितीत यांनी केली आहे.