अब्दुल सोगावकर
सोगाव : कार्लेखिंड येथे पात्रुदेवी मंदिराजवळील मोकळ्या जागेत दररोज मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त ओला कचरा टाकला जात असून, यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालक व प्रवाशांना नाक बंद करून जावे लागत आहे. कुजलेल्या मच्छी, चिकन, फळे-भाज्या आणि मृत प्राण्यांचा समावेश असलेल्या कचऱ्यामुळे तीव्र दुर्गंधी पसरली आहे, आणि परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाची प्रतिक्रिया व कारवाईचा इशारा
नागरिकांनी अज्ञात कचरा फेकणाऱ्यांविरोधात कडक कारवाईची मागणी केली असून, वनविभागाचे परिमंडळ वनाधिकारी तुकाराम जाधव यांनी स्पष्टीकरण दिले की, “या ठिकाणी पूर्वीही कारवाई करण्यात आली आहे. यापुढे कोणाला कचरा टाकताना आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. जागरूक नागरिकांनी अशी माहिती विभागाला द्यावी.”
