• Mon. Jul 14th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रोहा तालुक्यात बकरी चरण्यास गेलेल्या महिलेवर जबरदस्ती करीत मारहाण; आरोपी पसार

ByEditor

Jul 6, 2025

अमूलकुमार जैन
अलिबाग
: रायगड जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून, नुकतीच एक धक्कादायक घटना रोहा तालुक्यात घडली आहे. बकरी चरण्यासाठी माळरानावर गेलेल्या अठ्ठावीस वर्षीय महिलेवर जबरदस्ती करीत मारहाण करण्यात आली. आरोपी हा ताम्हणशेत आदिवासी वाडीचा रहिवासी असून, त्याचे पूर्ण नाव अद्याप अस्पष्ट आहे.

दि. ३ जुलै २०२५ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजता संबंधित महिला ही तिच्या बकऱ्या चरण्यासाठी माळरानावर गेली होती. त्याचवेळी आरोपी रवि तिच्या जवळ आला आणि अश्लील भाषा वापरून तिला जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला. त्याने पीडित महिलेला जमिनीवर फेकून कपडे फाडण्याचा प्रयत्न करत तोंड दाबून मारहाण केली. अचानक झालेल्या प्रकारामुळे महिला घाबरून गेली आणि आरडाओरडा करू लागली.

महिलेचा आरडाओरडा ऐकल्याने आसपास कोणी येईल या भीतीने आरोपीने तेथून पलायन केले. या हल्ल्यात महिला जखमी झाली असून तिने उपचार घेतल्यानंतर बहिणीकडे जाऊन हा प्रकार सांगितला.

घटनेबाबत रोहा पोलिस ठाण्यात ४ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गु.र.नं १३७/२०२५ अंतर्गत भारतीय न्यायसंहितेच्या कलम ७४, ७६ आणि ११५(२) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!