• Thu. Jan 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कडसुरे गावाचा “गौरव”, ओमकार शिर्के यांची CA पदवीप्राप्ती

ByEditor

Jul 7, 2025

प्रतिनिधी
नागोठणे :
कडसुरे गावाचा सुपुत्र ओमकार भालचंद्र शिर्के याने मे २०२५ मध्ये झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट अंतिम परीक्षेत यश मिळवून अवघ्या २३व्या वर्षी CA पदवी प्राप्त केली आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे कडसुरे गावाची मान अभिमानाने उंचावली असून ओमकारवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ओमकारचे शिक्षणाचे प्रारंभिक टप्पे नागोठण्यातील भा. ए. सो. एस. डी. परमार इंग्लिश मीडियम स्कूल व रिलायन्स फाऊंडेशन स्कूलमध्ये पूर्ण झाले. दहावीला ९०% गुण मिळवून त्याने पुणे गाठले. सिम्बायोसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समधून बारावी (८५%) व B.Com पूर्ण करताच, त्याने CA अभ्यासक्रमास प्रारंभ केला. दरम्यान, अमेझॉन कंपनीत दोन वर्षांचे इंडस्ट्रियल ट्रेनिंगही यशस्वीरित्या पूर्ण केले.

अभ्यासकाळात ओमकारने दररोज १५–२० तास मेहनत घेतली. आर्थिक अडचणी असूनही कुटुंबाने त्याला बळ दिले. आईने नोकरी सोडली, वडिलांनी व्यवसाय बंद करून पुण्यात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. आजी श्रीमती रजनी शिर्के यांचे मार्गदर्शन, बहिणी स्वरूपाचे प्रोत्साहन आणि वडीलधाऱ्यांचे आशिर्वाद हीच ओमकारच्या यशाची गुढी ठरली.

CA होऊन ओमकारने आपल्या यशाचे श्रेय शिक्षक, कुटुंब, नातेवाईक, मित्र व कडसुरे ग्रामस्थांना दिले आहे. त्याच्या जीवनप्रवासातले धैर्य, समर्पण आणि मेहनत आजच्या तरुणांसाठी आदर्श ठरू शकते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!