• Mon. Jul 14th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण टपाल कार्यालयासाठी जागेची मागणी

ByEditor

Jul 7, 2025

इच्छुकांनी 28 जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

नवी मुंबई : भारत सरकारच्या टपाल विभागातर्फे उरण येथे नवीन टपाल कार्यालय स्थापन करण्यासाठी उरण परिसरात भाडे तत्वावर जागेची मागणी करण्यात आली आहे. यासाठी सुमारे 1 हजार 264 चौरस फूट चटई क्षेत्रफळ/ बांधकाम क्षेत्रफळ असलेली जागा आवश्यक असून, इच्छुकांनी दि. 28 जुलै पर्यंत अर्ज सादर करावे. असे आवाहन वाशी नवी मुंबई विभागाचे वरिष्ठ अधीक्षक डाकघर यांनी केले आहे.

भारताचे राष्ट्रपती यांच्या वतीने उरण परिसरात टपाल कार्यालय सुरु करण्यासाठी आवश्यक असलेली जागा भाडेतत्वावर देण्यासाठी इच्छुक व्यक्ती, संस्था किंवा बांधकाम व्यवसायिक यांनी अपेक्षित भाडे, उपलब्ध जागेचे क्षेत्रफळ, अटी व शर्ती (काही असल्यास) व जागेच्या तपशीलासह आपले अर्ज प्रवर अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग, वाशी – 400703 या कार्यालयाकडे दि. 28 जुलै 2025 रोजी, दुपारी 4.30 वाजेपर्यंत सिलबंद लखोटयात पाठवावेत.

जागा निवडताना तिची उपयुक्तता व दैनंदिन पोस्ट ऑफिसच्या कामकाजासाठी सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. सदर जागा ही इमारत किंवा इमारतीचा भाग असावा. तसेच सदर जागेचे चटई क्षेत्र/ बांधकाम क्षेत्र हे 1 हजार 264 चौरस फूट(अंदाजे) उरण टपाल कार्यालयासाठी असावे. थोडासा क्षेत्रफळात फरक असला तरी तो ग्राह्य धरला जाईल.

अर्जासोबत इमारतीचा बांधकाम आराखडा, जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी, पंचायत परवानगी, 7/12 उताऱ्याची प्रत, वीज व पाण्याचे स्वतंत्र मीटर या संदर्भातील अर्जदाराच्या नावे असलेली आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 28 जुलै 2025 असून, दुपारी 4.30 वाजेपर्यंत अर्ज सादर करता येतील. अर्ज स्वीकारणे किंवा नाकारण्याचा संपूर्ण अधिकार टपाल विभागाकडे असून, कोणतेही कारण न देता अर्ज फेटाळण्याचा अधिकार विभागाने राखून ठेवलेला आहे.

अधिक माहितीसाठी प्रवर अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग, वाशी – 400703 (दूरध्वनी क्रमांक: 022-27666665/27663113) यांच्याशी सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन वाशी नवी मुंबई विभागाचे वरिष्ठ अधीक्षक डाकघर बी.व्ही.एन. सुरेश यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!