नितीन गायकवाड
नागोठणे : फिरण्यासाठी महाबळेश्वरला गेलेले नवी मुंबईतील एक तरुण व तरुणी यांचा परतीच्या प्रवासात अपघात झाला. सदर घटना दुपारी ३.३० वाजता सुकेळी खिंडीत घडली. उताराचा अंदाज न आल्याने मोटारसायकल अनियंत्रित झाली आणि रस्त्यावरील डिव्हायडरला जोरात आपटल्यामुळे दुर्दैवी अपघात घडला.
या अपघातात मोटारसायकल चालक क्रीश देवा साउथी (नेपाली, रा. बोणखडे, कोपरखैरणे सेक्टर १२) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्याच्या सोबत असणारी तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला तात्काळ उपचारासाठी मुंबईकडे रवाना करण्यात आले आहे.
सदर प्रकरणात मोटार वाहन अधिनियम १८४ अंतर्गत कलम १०६, २८१, १२५A, १२५B अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस हवालदार रुहीकर पुढील तपास करीत आहेत.
या वळणावर अपघात घडण्याचे प्रमाण वाढले असून स्थानिकांमध्ये यावर स्थायी उपाययोजनेची मागणी जोर धरत आहे. वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी स्पीड ब्रेकर, सूचना फलक, रिफ्लेक्टर किंवा संरक्षक भिंत बसवण्याची गरज आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.